Ketan Agarwal Murder Case Update : ‘आम्ही केतनशी जबरदस्ती तिचं लग्न…’; सियाच्या भावाची लोणावळा पोलिसांकडून दहा तास चौकशी, सिया-चेतनच्या नात्याचा उलगडा?

Ketan Agarwal Murder Case Update : ‘आम्ही केतनशी जबरदस्ती तिचं लग्न…’; सियाच्या भावाची लोणावळा पोलिसांकडून दहा तास चौकशी, सिया-चेतनच्या नात्याचा उलगडा?

पुणे : लोणावळा पोलिसांनी केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी सियाचा भाऊ साहिल गोयल यांची लोणावळा पोलिसांनी तब्बल 10 तास चौकशी केली. साहिलचा जवाब नोंदवण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यासा काल सकाळी 10 वाजता बोलण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी 12 पासून रात्री 10 वाजेपर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याला पोलिसांनी सियाने घरात केतन बरोबर लग्न न करण्याबाबत कधी विरोध दर्शविला होता का?, असा प्रश्न विचारला होता. त्यावर साहिल याने उत्तर देताना पोलिसांना माहिती दिली की, अशी कुठलीही बाब सियाने घरच्यांना कधीही सांगितली नाही. जर तिने कधी या गोष्टीला विरोध दर्शविला असता तर तिचे लग्न आमच्या कुटुंबाने इतर कुठेही तिच्या खुशीने व सहमतीने करून दिलं असतं. सियाच्या पसंतीने केतनसोबत तिचं लग्न लावण्यात येणार होतं. तिने केतनला पसंत केलं होतं. परंतु तिने कधीही केतन सोबत लग्नाला विरोध दर्शविला नाही.
हेही वाचा : Ketan Agarwal Murder Case Update: होणाऱ्या पतीला लोहगड कड्यावरून ढकलून देणाऱ्या सियाचा पोलीस कोठडीत माज; पश्चाताप तर लांबच, केली ही मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version