Chhatrapati Sambhajinagar Crime : धक्कादायक! मित्राला भेटण्यासाठी गेली, तरुणांनी दारू पाजली अन्…

टनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने थेट वेदांतनगर ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली
Chhatrapati Sambhajinagar Crime : धक्कादायक!  मित्राला भेटण्यासाठी गेली, तरुणांनी दारू पाजली अन्…

राज्यभरात गुन्हेगारीच्या घटणांची वाढ होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये मित्राबरोबर गेलेल्या एका तरूणीवर सामुहिक बलात्कार केला असल्याची माहिती समोर आली आहे. 

तरूणीला भेटायला आलेल्या मित्रासोबत हॉटेलवर बिअर प्याल्यानंतर मित्राला झोप लागली. त्यानंतर खोलीबाहेर आलेल्या तरुणीला त्याच मजल्यावरील दुसऱ्या खोलीतील तरुणांनी आणखी बिअर पाजून सामूहिक अत्याचार केला. १७ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजता रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने थेट वेदांतनगर ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत तिन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.  पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक १०५ मध्ये थांबले होते. 

मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा वेळ खोलीबाहेर आली होती. परत खोलीत जाताना मात्र तिने १०५ ऐवजी चुकून खोली क्रमांक २०५ मध्ये प्रवेश केला. त्या खोलीत आरोपी ऋषिकेश, घनश्याम आणि किरण दारूचे सेवन करत होते. आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहेर गेली. मात्र, एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बिअर पाजली. यात तरुणीची शुद्ध हरपत गेली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हॉटेलमधून पलायन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version