Nashik Crime : धक्कादायक घटना! दारूसाठी पैसे देण्यास आईचा नकार; मद्यपी मुलाने रागातून आईवरचं केले कुऱ्हाडीने वार

Nashik Crime : धक्कादायक घटना! दारूसाठी पैसे देण्यास आईचा नकार; मद्यपी मुलाने रागातून आईवरचं केले कुऱ्हाडीने वार

नाशिक : नाशिकच्या हनुमाननगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मद्यपी मुलाने जन्मदात्या 80 वर्षीय आईची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा आरोप आहे. कमलाबाई वळवी असं मृत वृद्ध महिलेचं नाव असून, त्यांचा मुलगा तानाजी वळवी याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमवारी रात्री दारूच्या नशेत तानाजीने आईकडे पैशांची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केल्याची माहिती आहे. गंभीर जखमी कमलाबाईंना नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तानाजी मद्याच्या नशेत पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी आई कमलाबाई मुलाला रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आलं आहे. अखेर दारूच्या व्यसनातून सुरू असलेल्या घरगुती वादाचा शेवट जन्मदात्या आईच्या हत्येत झाला. या घटनेने हनुमाननगर-ध्रुवनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, आगीच्या ज्वाळांनी परिसरात धूराचे साम्राज्य; पादचाऱ्यासह तिघे ठार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version