Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी NIA ची कारवाई; दहशदवादी उमरला मदत करणारा शोएब अटकेत

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात National Investigation Agency (NIA) ने सातवा आरोपी शोएबला फरीदाबादमधून अटक केली आहे.
Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी NIA ची कारवाई; दहशदवादी उमरला मदत करणारा शोएब अटकेत

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोट प्रकरणात एनआयएने आणखी एक आरोपीला अटक केली आहे. फरीदाबादमधील धौज परिसरातून शोएब या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या आता सात झाली आहे.  National Investigation Agency (NIA) च्या तपासात स्पष्ट झाले आहे की 10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटापूर्वी शोएबने दहशदवादी डॉक्टर उमर उन नबीला महत्त्वाची लॉजिस्टिक मदत दिली होती.

या भयानक हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात  National Investigation Agency (NIA) आधीच सहा जणांना अटक केलेली होती आणि अजूनही अनेक राज्यांत छापेमारी सुरू आहे. तपास यंत्रणा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित सर्व व्यक्तींना शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहे. या हल्ल्यामागील संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी NIA स्थानिक पोलिसांसह समन्वयाने तपास पुढे नेत आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar : भाजीत शिजलेली पाल; वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, काहींना उलट्या तर काहींनी…

दिल्ली स्फोट प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. यात पंपोर, पुलवामाचा आमिर राशिद अली, अनंतनागचा जासिर बिलाल वानी, पुलवामाचा डॉ. मुजम्मिल शकील, अनंतनागचा डॉ. अदील अहमद, लखनौची डॉ. शाहीन सईद, शोपियांचा मुफ्ती इरफान अहमद आणि फरीदाबादच्या धौज येथील शोएब या सात जणांचा समावेश आहे. हे सर्वजण कार बॉम्बस्फोटाच्या कटात विविध प्रकारे सहभागी असल्याचा आरोप NIA ने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोएब अल-फलाह विद्यापीठात वार्ड बॉय म्हणून काम करत होता आणि त्याची ओळख उमर उन नबी आणि मुजम्मिल यांच्याशी पूर्वीपासूनची होती. शोएब मेवातहून रुग्णांना घेऊन उमर आणि मुजम्मिलकडे जात असे, त्यामुळे त्यांच्यात नियमित संपर्क होत असे. तपासात असेही समोर आले आहे की शोएबने आतंकी उमरला नूंहमध्ये आपल्या सालीच्या घरी थांबवले आणि इतर ठिकाणीही त्याला शरण तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

हेही वाचा: Basketball Player Hitesh Rathi Tragic Death: 16 वर्षीय राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडूचा सरावादरम्यान दुर्दैवी अंत; छातीवर पोल कोसळल्याचा Video Viral

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version