कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच

कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच

कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागला असून कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, आता मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डी. के. शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होत. मात्र, आता काँग्रेसचे जेष्ठ नेते जी. परमेश्वर यांचं नावदेखील पुढे येत आहे.

चर्चेत असणाऱ्या या निघाची काय आहे नेमकी कारकीर्द?

डी. के. शिवकुमार
डी. के. शिवकुमार हे सात वेळा आमदार झाले होते. ते कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि संकटमोचक होते. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते २०१३ पासून आहेत. देशातल्या सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी ते एक आहेत. तर, भ्रष्टाचारप्रकरणी २०१९ ला त्यांना ईडीकडून अटक झाली होती.

सिद्धरामय्या
सिद्धरामय्या यांचा जनता दल, जेडीएस ते काँग्रेस असा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. ते काँग्रेसमध्ये २००५ पासून सक्रिय आहेत. कर्नाटकचे २०१३ ते २०१८ ला मुख्यमंत्री सिद्धरामय्या झाले होते. तर, दलित, मुसलमान मतदारांमध्ये ते प्रसिद्ध आहेत.

जी. परमेश्वर
जी. परमेश्वर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते ५ वेळा आमदार राहिले आहेत. कुमारस्वामी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाचे २०१३ मध्येही ते दावेदार होते. २०१५ ते २०१७ या दरम्यान ते कर्नाटकचे गृहमंत्री राहिले आहेत. तर, कर्नाटक काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version