राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय फलंदाजाने आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 29 चेंडूंत 97 धावांची खेळी केली. ज्यात पाच चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. तर त्याचा स्ट्राईक रेट 334 पेक्षा जास्त होता. भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या सनसनाटी खेळीचे कौतुक केले. त्यांनी त्याच्या “उत्कृष्ट बॅट स्विंग”चा आणि पायांवर येणाऱ्या चेंडूंसाठी तो ज्याप्रकारे आपला पुढचा पाय बाजूला करतो, ज्यामुळे त्याला षटकार मारण्याचे स्वातंत्र्य मिळते, याचा विशेष उल्लेख केला. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या चालू हंगामात आतापर्यंत 65 षटकार ठोकून, एका टी-20 स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा विक्रमही मोडला.
‘एक्स’द्वारे पोस्ट सचिनने वैभवचे कौतुक केले असून यामध्ये नमूद केले की, “वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग अप्रतिम आहे. त्याहूनही उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, त्याच्या पायांच्या दिशेने येणाऱ्या चेंडूंसाठी जागा तयार करण्याकरिता तो ज्या सहजतेने आपला पुढचा पाय बाजूला करतो. याच स्वातंत्र्यामुळे तो अशा प्रकारे खेळू शकतो. ती खेळी नेत्रदीपक होती!” तर युवराज सिंग यानेदेखील पोस्ट शेअर करत, भारताच्या विश्वचषक विजेत्या अष्टपैलू खेळाडूनेही गेलचा विक्रम मोडल्याबद्दल ‘बॉस बेबी’चे कौतुक केले आणि पोस्ट केले, “बॉस बेबीने वर्ल्ड बॉसचा विक्रम मोडला! अविश्वसनीय, या मुलाला खेळताना पाहणे खूप छान वाटते, असे नमूद केले आहे.
Vaibhav Sooryavanshi’s bat swing has been outstanding. What’s even more remarkable is how beautifully he clears his front foot to create room for balls aimed at his legs. This freedom allows him to play the way he does. That innings was nothing short of spectacular! — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 27, 2026