Vinayak Raut : घरातून 13 बॅगा भरून नेल्या, थ्री बेडरुमचा फ्लॅट, दोन कोटींवरून 12 कोटींपर्यंतची डिमांड वाढवली; विनायक राऊतांनी सून गिरीजाबाबत वाचला धक्कादायक खुलाशांचा पाढा

Vinayak Raut : घरातून 13 बॅगा भरून नेल्या, थ्री बेडरुमचा फ्लॅट, दोन कोटींवरून 12 कोटींपर्यंतची डिमांड वाढवली; विनायक राऊतांनी सून गिरीजाबाबत वाचला धक्कादायक खुलाशांचा पाढा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत त्यांच्या मुलासह विनायक राऊतांवरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना विनायक राऊत यांनी उत्तर देताना सुनेबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. विनायक राऊत यांनी म्हटले की, प्रत्येकवेळी मी आईवडिलांना घेऊन जात होते. असं तिने तक्रारीत म्हटलंय. आईवडिल संज्ञान आहे. मुलगी संज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी गैरप्रकार आहे. तर पोलिसांकडे का गेले नाही. गिरीजा आणि तिच्या वडिलांनी पोलिसात तेव्हाच धाव का घेतली नाही. तिने तक्रारीत म्हटलं मी स्वःतहून माहेरी गेले आहे.

हेही वाचा : Jejuri Accident: पंढरीच्या वाटेवर दु:खाचा डोंगर! सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

पुढे त्यांनी गिरीजाबाबत सांगताना नमूद केले की, स्त्रीधन मी घेऊन आले आहे. यासोबतच 13 बॅग घरातून घेऊन ती निघाली. स्त्रीधन सासरी किती आणलं आणि जाताना किती घेऊन गेले हे हिंमत असेल तर सांगावं. तिला जे मिळालं ते तिचं नशीब. आम्हाला त्यात पडायचं नाही. जे मिळालं त्यात त्यांनी सुखी राहावं. त्यांच्या डिमांड दुपटीने वाढत होत्या. सुरुवातीला दोन बेडरूम मागितला. दोन कोटी रुपये वरून पाच कोटी मागितले. आता 10 कोटीची मागणी केली आहे. थ्री बेडरूमचं घर मागितलं. ईएमआय मी भरणार नाही. तुम्हीच भरा. या सर्व डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांनी आरोप केला आहे. आम्ही आरोपाला भीक घालत नाही. आम्ही अध्यात्मिक आहोत. पंढरपूरचा पांडुरंग आणि बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. कुलदेवतेला गावाला जाणं हा काही गुन्हा नाही.