नवी दिल्लीः पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा घटस्फोट होऊन आता एक वर्ष झाले आहे. शोएब मलिकने जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. घटस्फोटाच्या एका वर्षानंतर, आता बातमी येत आहे की, सानिया मिर्झाने तिच्या दुबईतील घरातून तिचा माजी पती शोएब मलिकचे नाव काढून टाकले आहे. तिने शोएबच्या नावाऐवजी एका खास व्यक्तीचे नाव लिहिले आहे.
सानिया मिर्झाने कोणाचं नाव लिहिलंय?
सानिया मिर्झाने तिच्या दुबईतील घरावर शोएब मलिकचे नाव न लिहिता तिच्या मुलाचे म्हणजे इजहानचे नाव लिहिले आहे. सानिया मिर्झासाठी हा बदल एक नवीन सुरुवात आहे, कारण ती तिच्या नवीन व्हिलामध्ये अनेक मोठे बदल करत आहे. सानिया मिर्झा आता तिचा मुलगा इजहानसोबत या घरात राहण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हिलाचे फक्त किरकोळ काम बाकी असून लवकरच ते पूर्ण होणार आहे आणि सानिया मिर्झा तेथे लवकरच स्थलांतरित होणार आहे.
हेही वाचा - Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भाविकांनी भरलेल्या बसला भीषण अपघात! 7 जणांचा मृत्यू
सानिया मिर्झाचा जवळचा मित्र
सानिया मिर्झा बऱ्याच काळापासून तिच्या मुलासोबत यूएईमध्ये राहत आहे. तिने सांगितलंय की, इजहान तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि आता तोच तिच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. सानिया मिर्झाने तिचा मुलगा इजहान हाच तिचा सर्वात चांगला मित्र म्हटले आहे. 2010 मध्ये शोएब मलिकने आयशा सिद्दीकीशी घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झासोबत लग्न केले होते. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे लग्न हैदराबादमध्ये झाले होते. 2018 मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक आई-वडील बनले. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकचा जन्म 30 ऑक्टोबर 2018 रोजी झाला.
हेही वाचा - Viral News : नवरदेवाने स्वत:च्या लग्नात ‘या’ गाण्यावर केलं नृत्य; मुलीच्या वडिलांनी लग्नच मोडलं!
2023 मध्ये टेनिसला अलविदा
2022 पासून शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. सानियाने 2023 मध्ये व्यावसायिक टेनिसला निरोप दिला होता. तिच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत, तिने 43 WTA दुहेरीचे विजेतेपद आणि एक एकेरी विजेतेपद जिंकले आहे. शोएब मलिक आणि सना जावेद बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने शोएब मलिकशी दुसरे लग्न केले होते. सना जावेदचे पहिले लग्न 3 वर्षातच तुटले. सना जावेदने 2020 मध्ये पाकिस्तानी गायक उमेर जसवालशी लग्न केले होते, परंतु नंतर 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.