Sunday, September 08, 2024 09:29:40 AM

Modi in Russia
पंतप्रधान मोदी रशियात

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदी रशियात

मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियात पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले. विमानतळावर मोदींना लष्करी सलामी देण्यात आली. मॉस्को येथे होणार असलेल्या भारत - रशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेत भारत आणि रशिया यांच्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा आणि करार होण्याची शक्यता आहे. शिखर परिषदेव्यतिरिक्त मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. मोदी २०१९ मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेले होते तर पुतिन २०२१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. यानंतर आता २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशिया यांच्यात वर्षाकाठी सुमारे ५६ अब्ज ९५ कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. यामुळे मोदींच्या रशिया दौऱ्याला महत्त्व आले आहे.


सम्बन्धित सामग्री