Monday, January 27, 2025 09:28:32 AM

Order of inquiry into Bangladeshi infiltrators
बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे आदेश

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता.

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता. मुंबई पोलिसांनी ३० वर्षीय बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला सैफवरील हल्ल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. त्यातच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने बांगलादेशी घुसखोरांवर केलेल्या अहवालावरून मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

टीआयएसएसचा अहवाल काय? 

बेकायदेशीरपणे घुसखोरीमुळे मुंबईत सामाजिक आर्थिक परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षात देशातील अनेक भागात बांगलादेशींचे वास्तव्य वाढलंय. अवैध बांगलादेशींमुळे स्थानिक मजुरांना रोजगार मिळत नाहीत. मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. 1961 साली मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 88 टक्के होती. 2011 साली 66 टक्के झाली. मुस्लीम लोकसंख्या 8 टक्क्यांवरून 21 टक्के झाली आहे. घुसखोरांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर दबाव येतो आहे.आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या सुविधांवर ताण पडतो आहे. स्थानिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी घुसखोरांवर कारवाईची गरज आहे. 

हेही वाचा : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

दिल्लीतही पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून बेकायदेशीररित्या राहणाऱ्या घुसखोरांवर कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. घुसखोरांमधील काही लोकांचे संबंध दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे यांची नावे निवडणूक यादीत टाकली जातात, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 


सम्बन्धित सामग्री