न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडले आहेत. यामुळे जगभर अनेक ऑनलाईन सेवा कोलमडल्या आहेत. जगातील अनेक विमान कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी विमान वाहतूक कोलमडली आहे. बँक सेवांवरही परिणाम झाला आहे.
सायबर सुरक्षेशी संबंधित प्रणाली अद्ययावत करताना निर्माण झालेल्या तांत्रिक गुंतागुंतीमुळे मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडल्याचे समजते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत.