उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कालपासून कुंभ महामेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. काल कुंभ मेळ्यात दीड कोटी भाविकांनी शाही स्नान करत मेळ्यात सहभाग नोंदवला आहे. आजपासून 13 आखाड्यांचं अमृत स्नान होणार असून, यामध्ये साधू संत भाग घेतील. तसेच आजपासूनच भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत.
कुंभ मेळ्याला देशभरातूनच नाही तर विदेशातूनही भाविकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. जर्मनी, ब्राझील, रशियासह 50 हून अधिक देशांतून भाविक कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. दर तासाला सुमारे २ लाख भाविक संगमावर स्नान करत आहेत. यामुळे संगमाच्या सर्व प्रवेश मार्गांवर अवाढव्य गर्दी आहे. वाहने बंद केली गेली आहेत आणि भाविक बस व रेल्वे स्थानकांपासून 10-12 किलोमीटर पायी चालत संगम पर्यंत पोहोचत आहेत.
👉👉 हे देखील वाचा : महाकुंभ 2025 : केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केले 'कलाग्राम'चे उद्घाटन
कुंभ मेळ्यात सुरक्षिततेसाठी 50 हजार पोलिस कर्मचारी, स्पेशल कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस स्पीकरवरून गर्दीचे व्यवस्थापन करत आहेत. तसेच, 2 हजारांहून अधिक नागा साधू संगमावर उपस्थित आहेत. प्रशासनाने सर्वत्र पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे.
कुंभ मेळा हा एक पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये लाखो लोक आपल्या आध्यात्मिक कर्तव्यासाठी एकत्र येतात. यावेळी भाविकांची आस्था आणि धर्मानुष्ठानाची भावना प्रकट होते, तर सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
संपूर्ण कुंभ मेळ्यात असलेला उत्साह आणि श्रद्धा याचे प्रतीक म्हणून ही एक ऐतिहासिक कार्यक्रम मानले जात आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.