Saturday, March 29, 2025 04:56:15 AM

इराणवर इस्रायलचा हवाई हल्ला

इराणमध्ये तेहरान येथे इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ, असे इराण सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले.

इराणवर इस्रायलचा हवाई हल्ला

तेहरान : इराणमध्ये तेहरान येथे इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ, असे इराण सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. तर इराण आणि त्यांचे समर्थक यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांना उत्तर म्हणून तेहरानला लक्ष्य केल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. सार्वभौम देशाला स्वसंरक्षणाचा आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे आणि ते त्यांचे कर्तव्य आहे, असे सांगत इस्रायलने तेहरानला लक्ष्य केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले.


सम्बन्धित सामग्री