Thursday, June 27, 2024 08:18:51 PM

Iran
इराणच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या ?

हेलिकॉप्टर कोसळून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री होसेन आमीर अब्दोल्लाहियान यांचा मृत्यू झाला. पण...

इराणच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या

तेहरान, २० मे २०२४, प्रतिनिधी : हेलिकॉप्टर कोसळून इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री होसेन आमीर अब्दोल्लाहियान यांचा मृत्यू झाला. पण हा अपघात नसून हत्या असल्याचा तसेच हत्येमागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री ज्या हेलिकॉप्टरमध्ये त्याच्यासोबत इराणचीच आणखी तीन हेलिकॉप्टर उडत होती. अतीविशिष्ट नागरिकांच्या संरक्षणासाठी तीन हेलिकॉप्टर आकाशात होती. पण संरक्षण पुरवणाऱ्या हेलिकॉप्टरना काही झाले नाही. मात्र अतीविशिष्ट नागरिकांचे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. याच कारणामुळे हत्येचा संशय व्यक्त होत आहे. 

इराणमध्ये राष्ट्रीय शोक

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्यामुळे इराणमध्ये पाच दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. भारत सरकारनेही एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन आमीर अब्दोल्लाहियान यांचा मृत्यू
हेलिकॉप्टर कोसळून इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री यांचा मृत्यू
अपघात की घातपात ? हत्येचा संशय...
उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुखबेर झाले हंगामी राष्ट्राध्यक्ष


सम्बन्धित सामग्री