बैरुत : इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या दक्षिणकेडली भागात हिझबुल्ला अतिरेकी संघटनेच्या एका तळावर हल्ला केला. या हल्ल्यात हिझबुल्लाचा आणखी एक स्वयंघोषीत कमांडर ठार झाला. ठार झालेल्या कमांडरचे नाव अरायब अल शोगा असे होते. अरायब अल शोगा हिझबुल्लाच्या रडवान फोर्सच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विभागाचा कमांडर होता. हिझबुल्लाचा आणखी एक स्वयंघोषीत कमांडर वाकिफ सफा गंभीर जखमी आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.