Thursday, March 20, 2025 09:07:35 AM

Mexico Bus Accident: मेक्सिकोमधील टॅबास्कोमध्ये भीषण बस अपघात; 40 जणांचा मृत्यू

दक्षिण मेक्सिकोमध्ये बस कॅनकुनहून तबास्कोला जात असताना झालेल्या बस अपघातात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

mexico bus accident मेक्सिकोमधील टॅबास्कोमध्ये भीषण बस अपघात 40 जणांचा मृत्यू
Mexico Bus Accident
Edited Image

Mexico Bus Accident: मेक्सिकोमधून अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. दक्षिण मेक्सिकोमध्ये बस कॅनकुनहून तबास्कोला जात असताना झालेल्या बस अपघातात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, तबास्कोच्या कोमाल्काल्कोचे महापौर ओव्हिडिओ पेराल्टा म्हणाले की, 'कॅनकुनहून तबास्कोला जाणाऱ्या बसमध्ये झालेल्या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर खूपचं दु:ख झाले. त्यात तबास्कोमधील लोक प्रवास करत होते. आम्ही आवश्यक ती मदत देण्यासाठी संघीय आणि राज्य अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधत आहोत.' 

हेही वाचा - अमेरिकेतील अलास्कामध्ये कोसळले बेपत्ता विमान; 10 प्रवाशांचा मृत्यू

अपघातानंतर केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना, पेराल्टा यांनी सांगितले की, त्यांनी आवश्यक मदत देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. आपत्कालीन सेवा देखील पुरवण्यात आली आहे आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट

बस ऑपरेटर टूर्स अकोस्टा यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी गाडीत सुमारे 44 प्रवासी बसमध्ये होते. दरम्यान, कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. कंपनीने म्हटले आहे की, बस वेग मर्यादेत धावत होती आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी ते अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत.


सम्बन्धित सामग्री