Thursday, December 26, 2024 08:38:05 PM

Netanyahu
'त्या' नकाशातून पॅलेस्टाईन गायब

संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दोन नकाशे दाखवले. पॅलेस्टाईन दोन्ही नकाशांमध्ये दिसत नव्हता.

त्या नकाशातून पॅलेस्टाईन गायब

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दोन नकाशे दाखवले. यात शापीत देश असा उल्लेख असलेल्या कागदावर इराण, इराक, सीरिया आणि येमेन हे देश काळ्या रंगात रंगवण्यात आले होते. तर दुसऱ्या कागदावर आशीर्वाद देणारे देश असा उल्लेख करुन इजिप्त, सुदान, सौदी अरेबिया आणि भारत हे देश हिरव्या रंगात दाखविण्यात आले होते. विशेष म्हणजे इस्रायलचा शेजारी देश असलेला पॅलेस्टाईन दोन्ही नकाशांमध्ये दिसत नव्हता. पॅलेस्टाईनचा उल्लेख नेतन्याहू यांनी टाळला. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 

पॅलेस्टाईनच्या मोठ्या भूभागावर राज्य करणाऱ्या हमास या अतिरेकी संघटनेने काही महिन्यांपूर्वी इस्रायलमध्ये हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अनेक जण मारले गेले आणि जखमी झाले होते. यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये हमास या अतिरेकी संघटनेला लक्ष्य करुन अनेक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हमासचे अनेक अतिरेकी ठार झाले. मारल्या गेलेल्यांमध्ये हमासचे अनेक प्रमुख अतिरेकीही होते. यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलताना इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईनचा उल्लेख टाळत दोन नकाशे दाखवले. यामुळे पॅलेस्टाईनच्या भवितव्यावरुन चर्चेला उधाण आले आहे. 

           

सम्बन्धित सामग्री