Sunday, April 13, 2025 12:50:26 PM

ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर

ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर

ब्राझील, ५ मे २०२४, प्रतिनिधी: ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाने चांगलंच थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. या विनाशकारी महापुरात आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले. एएनआयने अल जझीराचा हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. सध्या बचाव आणि मदत कार्य सातत्याने सुरू आहे. घरे, रस्ते आणि पुलांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी बचाव पथक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

रिओ ग्रांदे दो सुलमध्ये पाण्याची पातळी जास्त असल्याने धरणांवरचा भार वाढत असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूरस्थिती पाहता गव्हर्नर एडुआर्डो लीट यांनी परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे. "आम्ही आमच्या इतिहासात पाहिलेल्या सर्वात वाईट शोकांतिकेचा सामना करत आहोत," असं त्यांनी म्हटलं आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी प्रभावित भागात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेथे मानवी आणि भौतिक साधनांची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.


सम्बन्धित सामग्री