Thursday, June 27, 2024 08:39:30 PM

इराण-इस्रायल संघर्ष भडकला

इराण-इस्रायल संघर्ष भडकला

इराण-इस्रायल, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : इराणने अखेर इस्रायलविरुद्ध सूड उगविलाच. भारतीय वेळेनुसार रविवारी मध्यरात्री ३ वाजता इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मिळून एकापाठोपाठ ३०० हल्ले केले. अमेरिकन लष्कराने यापैकी अनेक ड्रोन कोसळण्यापूर्वी हवेतच पाडले; तर इस्रायलच्या आयर्न डोमने तसेच एअरो 3 डिफेन्स सिस्टीमने इराणच्या क्षेपणास्त्रांचा मारा रोखला. इराणचा ९९ टक्के मारा आम्ही हवेतच निष्प्रभ केला.

बहुतांश ड्रोन, क्षेपणास्त्रे वाटेतच पाडली, असे इस्रायलच्या लष्कराने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलेले आहे. इराणच्या एका हल्ल्यात इस्रायलच्या नेगेव या वाळवंटी भागातील नेवातीम हवाई तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले. पळापळ होऊन त्यात १२ जण जखमी झाले. इराणने सोडलेल्या काही ड्रोन्सना वाटेत सीरिया आणि जॉर्डनमध्येच पाडण्यात आल्याचे टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या वृत्तात म्हटलेले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताने इस्रायली अधिकार्‍यांचा संदर्भ देऊन प्रकाशित केलेल्या वृत्तात, इराणने १८५ ड्रोन रवाना केले आणि 36 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, असे म्हटलेले आहे. बहुतांश आयुधांचे प्रक्षेपण इराणमधूनच करण्यात आले होते. काही शस्त्रे मात्र इराक आणि येमेनमधूनही डागली गेली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ११० क्षेपणास्त्रे इराणने डागली, असेही या वृत्तात नमूद आहे.


सम्बन्धित सामग्री