Thursday, June 27, 2024 08:37:18 PM

इराणने जप्त केलेल्या जहाजावर १७ भारतीय

इराणने जप्त केलेल्या जहाजावर १७ भारतीय

तेहरान, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : इराण आणि इस्रायल यांच्यात मागील काही दिवसांपासून तणाव वाढत आहे. या वातावरणात इराणने इस्रायलमधील अब्जाधीशाच्या मालकीचे जहाज जप्त केले. या जहाजावर १७ भारतीय क्रू सदस्य कार्यरत आहेत. भारत सरकार इराण सरकारच्या संपर्कात असून अडचणीत सापडलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. प्राथमिक वृत्तानुसार जहाज होर्मुज येथून जात होते त्यावेळी इराणच्या कमांडो पथकाने जहाजावर धाड टाकली. यानंतर जहाज जप्त करण्यात आले.

दहशतवाद्यांना मदत देऊन इराण आमच्या विरोधात कारवाया करत आहे, असा आरोप करत इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला. इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या सैन्याशी संबंधित महत्त्वाचे अधिकारी मारले गेले. यानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला आहे. आता जहाज जप्तीमुळे तणावात आणखी वाढ झाली आहे. वाढत्या तणावाची दखल घेत भारत सरकारने भारतीयांना इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये जाणे टाळा, अशी सूचना केली केली आहे.

जप्त केलेल्या जहाजावर पोर्तुगालचा झेंडा होता. जहाजावर २५ जण कार्यरत आहेत, त्यापैकी १७ जण भारतीय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजाचा मालक इस्रायली अब्जाधीश आहे.

  

सम्बन्धित सामग्री