Saturday, September 28, 2024 02:04:00 PM

तैवानमध्ये भूकंप; ७.७ रिश्टर स्केलची तीव्रता

तैवानमध्ये भूकंप ७७ रिश्टर स्केलची तीव्रता

नवी दिल्ली, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : तैवान भागात बुधवारी सकाळी आठच्य  सुमारास पूर्वेला ७.७ रिश्टर स्केलचा भूंकप झाला. तैवानमधील भूकंपानंतर दक्षिण जपानच्या काही भागात आणि फिलीपाईन्समध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या हुआलियनच्या डोंगराळ आणि विरळ लोकसंख्या असलेल्या पूर्व काऊंटीमध्ये खडक पडून चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे तसेच ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागाने दिली. हुआलियनमध्ये २६ इमारती कोसळल्या. त्यात सुमारे २० जण अडकले आहेत त्याचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.   

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल होती. तर जपानच्या हवामान संस्थेने ७.७ रिश्टर स्केलची तीव्रता सांगितली आहे. सप्टेंबर १९९० च्या भूकंपाचा संदर्भ देत  तैवानच्या पूर्वेला आलेला हा भूकंप २५ वर्षातील सर्वात शक्तिशाली होता. ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेने आलेल्या भूकंपात २४०० लोक मारले गेले अशी माहिती तैपईचे भूकंपविज्ञान केंद्राचे संचालक वु चिएन फू यांनी  म्हणाले आहेत.


सम्बन्धित सामग्री