Thursday, June 27, 2024 08:30:00 PM

जहाज धडकताच पूल कोसळला

जहाज धडकताच पूल कोसळला

मेरीलँड, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : अमेरिकेतील मेरीलँड येथे एक मालवाहक जहाज धडकल्यामुळे 'फ्रान्सिस स्कॉट ब्रिज' कोसळला. ही दुर्घटना अमेरिकेतील वेळेनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. जहाज पुलाला धडकले. यानंतर पूल कोसळला आणि जहाजाला आग लागली. थोड्या वेळाने जहाज बुडाले.

मालवाहक जहाजावर सिंगापूरचा झेंडा होता. हे जहाज श्रीलंकेतील कोलंबो बंदराच्या दिशेने जाणार होते. पण आधीच जहाज बुडाले.

जहाजाच्या धडकेमुळे पूल कोसळला, त्यावेळी पुलावर अनेक वाहने होती. ही वाहने पाण्यात पडली. दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

हाती आलेल्या माहितीनुसार, पुलाला धडकलेले जहाज ९४८ फुटांचे होते. हे जहाज ज्या पुलाला धडकले तो पूल १९७७ मध्ये बांधण्यात आला होता. पेटाप्सको नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या फ्रान्सिस स्कॉट यांच्या स्मरणार्थ नदीवरील पुलाला त्यांचे नाव देण्यात आले होते.

https://www.youtube.com/shorts/k-dNTN_3N_M

     

सम्बन्धित सामग्री