Saturday, September 28, 2024 02:02:38 PM

रशियात दहशतवादी हल्ला

रशियात दहशतवादी हल्ला

मॉस्को, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : रशियाची राजधानी मॉस्को येथे क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाला. इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक या दहशतवादी संघटनेने मॉस्कोतील हल्ला केल्याचे जाहीर केले. त्यांनी एका टेलिग्राम चॅनलवरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले. मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यात ११५ जण ठार झाले. हल्ला करून घटनास्थळावरून पळालेले दहशतवादी सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत, असेही इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक या दहशतवादी संघटनेने टेलिग्राम चॅनलवरून जाहीर केले.

रशियाची तपास यंत्रणा घटनास्थळी तसेच आसापसच्या परिसरात असलेल्या कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी इन्गुशेतियाचे होते, असे वृत्त रशियातील माध्यमांनी दिले आहे. सैनिकांच्या वेषात आलेल्या या दहशतवाद्यांनी क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार केला, असेही वृत्त रशियातील माध्यमांनी दिले आहे.

दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी हॉलमध्ये ६२०० नागरिक होते. अंदाधुंद गोळीबार सुरू असतानाच हॉलमध्ये स्फोट झाला आणि आग लागली. पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक जिंकली आहे. ते पाचव्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मागील दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू आहे. या वातावरणात मॉस्कोतील क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये दहसतवादी हल्ला झाला आहे. पुतिन घडलेल्या घटनेची माहिती घेत आहेत.

              

सम्बन्धित सामग्री