Tuesday, July 02, 2024 09:30:14 AM

हुती हल्ल्यासमुळे जागतिक इंटरनेट सेवा कोलमडली

हुती हल्ल्यासमुळे जागतिक इंटरनेट सेवा कोलमडली

प्रतिनिधी, मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : इस्रायल-हमास युद्धात उडी घेतलेल्या हुतीने गुरुवारी अमेरिकेसह जगाला मोठा धक्का दिला आहे. लाला समुद्रात तीन खंडांमध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या केबल्स टाकण्यात आल्या होत्या. आणि याच केबल्सना हुतीने कापले. त्यामुळे जगातील अनेक इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांचे मोठे नुकसान तर झाले आहेच शिवाय केबल्सचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मेटा, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. फेसबुक सेवा बंद झाल्यामुळे सोशल मीडियावर तक्रारी सुरूच होत्या. लोक म्हणत होते की त्यांचे फेसबुक हॅक झाले आहे तर सत्य हे आहे की लाल समुद्रात केबल कट झाल्यामुळे ही समस्या उदभवली आहे. तथापि, सीकॉम आणि टीजीएन ही एक प्रणाली आहे जी सीकॉम कम्युनिकेशन्सद्वारे चालवली जाते. तज्ज्ञांच्या मते, युद्धाच्या काळात या केबल्सच्या जोडणीमुळे किमान तीन महिने इंटरनेट सेवा विस्कळीत होईल.

                    

सम्बन्धित सामग्री