Saturday, October 05, 2024 03:28:33 PM

पुतिन यांच्या कट्टर राजकीय विरोधकाचा मृत्यू

पुतिन यांच्या कट्टर राजकीय विरोधकाचा मृत्यू

मॉस्को, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक ॲलेक्सी नॅव्हल्नी यांचा तुरुंगात मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून ते यामालो-नेनेट्स प्रदेशातील तुरुंगात शिक्षा भोगत होते. ते ४७ वर्षांचे होते, शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले. रशिया ऑफ द फ्युचर पार्टीचे नेते, भ्रष्टाचार विरोधी फाउंडेशनचे संस्थापक आणि पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. अज्ञातांकरवी ॲलेक्सी नॅव्हल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. या प्राणघातक संकटातून ते वाचले होते. यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती.


सम्बन्धित सामग्री