Monday, September 16, 2024 08:45:21 PM

अफगाणिस्तानमध्ये विमानाचा अपघात

अफगाणिस्तानमध्ये विमानाचा अपघात

बदख्शान, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अफगाणिस्तानमध्ये बदख्शानच्या वाखान भागात विमानाचा अपघात झाला. हे विमान अफगाणिस्तानमार्गे रशियात मॉस्को येथे जात होते. रशियाच्या दिशेने जात असताना विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळले. या दुर्घटनेत झालेल्या हानीबाबतची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. अपघात झालेले विमान हे चार्टर्ड प्रकारातील होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. विमान पर्वतरांजीतील दुर्गम भागात कोसळले आहे. हा पूर्ण परिसर तालिबानच्या अखत्यारित येतो. तालिबानने एक पथक अपघातस्थळी रवाना केले आहे.

बदख्शान प्रांत कुठे आहे ?

चीन, ताजिकिस्तान आणि पाकिस्तान या तीन देशांच्या सीमेजवळ अफगाणिस्तानच्या ईशान्यकडे बदख्शान प्रांत आहे.

विमान भारताचे आहे की नाही ?

सुरुवातीला काही माध्यमांनी कोसळलेले विमान भारताचे असल्याचे वृत्त दिले होते. पण भारताचे विमान अफगाणिस्तानमध्ये कोसळलेले नाही, अशी माहिती भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.


सम्बन्धित सामग्री