Tuesday, July 02, 2024 08:35:54 AM

स्मृती इराणींचा मदिना दौरा

स्मृती इराणींचा मदिना दौरा

मदिना, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय महिला व बालकल्याण आणि अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दोन दिवसांचा सौदी अरेबियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मुसलमानांचे पवित्र शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदिना शहराला भेट दिली. हज यात्रेच्या निमित्ताने मदिना शहरात येणाऱ्या भारतीय नागरिकांना मिळणार असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच हज यात्रेत सेवा देत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. मदिना शहराच्या दौऱ्यात स्मृती इराणींनी मुसलमानांना पवित्र असलेल्या प्रमुख धार्मिक स्थळांना भेट दिली. यात पैगंबराची मशीद, अल मशीद अल नबवी, उहुदचा पर्वत, क्युबा मशीद ही ठिकाणं होती. यानंतर भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात एक करार झाला. या करारानुसार २०२४ मध्ये भारताला हज यात्रेसाठी १ कोटी ७५ लाख ०२५ एवढा यात्रेकरूंचा कोटा मिळाला आहे. यातील १ कोटी ४० लाख ०२० जागा हज समितीसाठी राखीव असतील तर ३५ हजार ५ जागा हज ग्रुप ऑपरेटर यांच्यासाठी राखीव असतील.

स्मृती इराणींच्या दौऱ्यावरून कट्टर मुसलमानांमध्ये नाराजी

स्मृती इराणींच्या दौऱ्यावरून कट्टर मुसलमानांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. समाज माध्यमावर स्मृती इराणींच्या दौऱ्यावरून सौदी राजा आणि त्याच्या मंत्र्यांना ट्रोल केले जात आहे. पण या ट्रोलिंगकडे सौदी राजाने दुर्लक्ष केले आहे.

https://twitter.com/taab_e_sukhan/status/1744426157670273182

https://twitter.com/OJ_Smoke_/status/1744446693691494506

        

सम्बन्धित सामग्री