Saturday, July 06, 2024 11:58:50 PM

शेख हसिना सलग चौथ्यांदा पंतप्रधान होणार

शेख हसिना सलग चौथ्यांदा पंतप्रधान होणार

ढाका, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगने ३०० पैकी २०४ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे शेख हसिना सलग चौथ्यांदा पंतप्रधान होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. शेख हसिना यांनी आठव्यांदा सार्वत्रिक निवडणूक जिंकली. त्या १९८६ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून आल्या.

गोपालगंज - ३ या मतदारसंघातून बांग्लादेश सुप्रीम पक्षाच्या एम. निजामुद्दीन लष्कर यांचा २.४९ लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून शेख हसिना विजयी झाल्या. निवडणुकीत शेख हसिना यांना २ लाख ४९ हजार ९६५ मते मिळाली तर एम. निजामुद्दीन लष्कर यांना फक्त ४६९ मते मिळाली.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत, चीन आणि रशियाने शेख हसिना यांचे अभिनंदन केले. भारताच्या बांगलादेशमधील राजदुताने पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.


सम्बन्धित सामग्री