Tuesday, July 02, 2024 09:04:00 AM

उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला

उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला

सोल, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या येओनप्यॉन्ग बेटावर (Yeonpyeong Island) दोनशे तोफगोळे डागले. येओनप्यॉन्ग बेट हे दक्षिण कोरियाची राजधानी सोलपासून (Seoul) विमानमार्गे ११५ किमी. पूर्वेला आहे. उत्तर कोरियाने हल्ला केल्यानंतर दक्षिण कोरियाने येओनप्यॉन्ग बेटावरील नागरिकांचे तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. उत्तर कोरियाने तातडीने कारवाई थांबवावी आणि संयम राखावा नाहीतर त्यांना समजेल अशा शब्दात आम्हाला उत्तर द्यावे लागेल, असे दक्षिण कोरियाने खडसावले. याआधी दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी उत्तर कोरियाच्या सीमेवजवळ आठवडाभर संयुक्त लष्करी कवायती केल्या. या कवायतींचा समारोप झाला आणि उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या येओनप्यॉन्ग बेटावर दोनशे तोफगोळे डागले.


सम्बन्धित सामग्री