Tuesday, July 02, 2024 08:59:35 AM

दहशतवादी मसूद अझर पाकिस्तानमध्ये ठार

दहशतवादी मसूद अझर पाकिस्तानमध्ये ठार

बहावलपूर, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पाकिस्तानमधील बहावलपूर येथे झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटात भारताला हवा असलेला दहशतवादी मसूद अझर ठार झाला. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजता स्फोट झाला. या स्फोटात जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर ठार झाला. कंदहार विमान अपहरण प्रकरणात भारताला मसूद अझरला सोडून द्यावे लागले होते. नंतर संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांमध्ये मसूद अझर होता. याच कारणामुळे भारत सरकार अनेक वर्षांपासून मसूदला अटक करण्याच्या प्रयत्नात होते. भारत सरकारने जाहीर केलेल्या हव्या असलेल्या आरोपींच्या यादीतही मसूद अझरचा समावेश होता.

संभ्रम कायम

भारताने पाकिस्तानमध्ये बालाकोट येथे २०१९ मध्ये एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांना ठार केले होते. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझर ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील काही माध्यमांनी दिले होते. भारताने मसूद अझर ठार झाल्याच्या वृत्ताला त्यावेळी दुजोरा दिला नव्हता. आता पुन्हा एकदा मसूद अझर ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधून आले आहे. यावेळीही भारताकडून मसूद बाबतच्या वृत्तावर प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे मसूद अझर ठार झाला आहे की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

        

सम्बन्धित सामग्री