Thursday, September 19, 2024 04:21:03 AM

भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्सच्या ताब्यात

भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्सच्या ताब्यात

मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शुक्रवारी (दि. २२ डिसेंबर २०२३) दुबईहून भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं एक विमान फ्रान्सच्या सुरक्षा रक्षक यंत्रांनी ताब्यात घेत त्याला खाली उतरवलं आहे. या विमानात तब्बल ३०३ भारतीय प्रवाशी प्रवास करत होते. या विमानातून मानवी तस्करी होत असल्याचा संशय फ्रेंच सुरक्षा यंत्रणांना आहे, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. मात्र, या घटनेमुळे दोन्ही देशातील संबंधांवर परिणाम होणार का ? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. फ्रांसचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉनन या २६ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, त्यात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

भारतीय प्रवासी असलेले विमान फ्रान्सच्या ताब्यात
विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केल्याचा संशय


सम्बन्धित सामग्री