Tuesday, July 02, 2024 09:34:36 AM

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक

इस्लामाबाद, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने निववडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

वेळापत्रकानुसार २० ते २२ डिसेंबर २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येईल. यानंतर २४ ते ३० डिसेंबर २०२३ या काळात अर्जांची छाननी होईल. निवडणूक आयोगाने फेटाळलेले आणि स्वीकारलेले उमेदवारी अर्ज यावर ३ जानेवारी २०२४ पर्यंत अपील करता येईल. या अपिलांवर १० जानेवारी २०२४ पर्यंत सुनावणी पूर्ण करून निकाल दिला जाईल. यानंतर १२ जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. निवडणूक आयोग १३ जानेवारी २०२४ रोजी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप करेल. यानंतर प्रचार करता येईल. मतदान ८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत अर्थात लोकसभेत ३३६ जागा आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निश्चित झालेल्या या जागांपैकी ६० महिलांसाठी आणि १० इस्लाम धर्मीय नसलेल्या अल्पसंख्यांकांसाठी राखीव आहेत.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ९ ऑगस्ट २०२३ रोजी नॅशनल असेंब्ली बरखास्त केली. यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

     

सम्बन्धित सामग्री