Tuesday, July 02, 2024 09:36:45 AM

दहशतावादी अदनान कराचीत ठार

दहशतावादी अदनान कराचीत ठार

कराची, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर २०१६ मध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार हंजला अदनान कराचीत अज्ञातांनी केलेल्या कारवाईत ठार झाला. हंजला अदनानला चार गोळ्या लागल्या. जखमी अवस्थेत हंजला अदनानला कराचीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

लष्कर - ए - तोयबा संघटनेचा दहशतवादी हंजला अदनान हा २०१६ च्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार होता. या हल्ल्यात नऊ जवान हुतात्मा झाले आणि १८ पेक्षा जास्त जवान जखमी झाले होते. ही घटना घडल्यापासून भारतीय यंत्रणा हंजला अदनानला शोधत होती. हंजला अदनान हा पाकिस्तानमधून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी घडवून आणणे आणि ठिकठिकाणी घातपात करणे यासाठीही जबाबदार होता. पाकिस्तानमध्ये २०२३ या एकाच वर्षात २४ पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. अज्ञातांच्या कारवाईत दहशतवादी ठार झाले आहेत. यामुळे दहशतवाद्यांच्या भारत विरोधी कारवाया मंदावल्या आहेत.

सीआरपीएफवरील २०१६ च्या हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हंजला अदनान कराचीत ठार
दहशतवादी मलिक असलम वजीर दक्षिण वझिरिस्तानातील दाजा घुंडई येथे स्फोटात ठार
मौलान मसूद अझरचा विश्वासू दहशतवादी मौलाना रहीम तारिक उल्ला कराचीत १३ नोव्हेंबर रोजी ठार
हाफिझ सईदचा विश्वासू दहशतवादी अकरम खान उर्फ अकरम गाझी ठार

        

सम्बन्धित सामग्री