Saturday, October 05, 2024 03:08:24 PM

इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी

इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी

तेल अवीव, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी जाहीर झाली आहे. ही युद्धबंदी चार दिवसांसाठी आहे. हमास त्यांच्या ताब्यात असलेल्या तीस मुलांसह इस्रायलच्या पन्नास नागरिकांची सुटका करणार आहे. या बदल्यात इस्रायल युद्ध काळात पकडलेल्या पॅलेस्टाईनच्या १५० जणांना सोडणार आहे. दोन्ही बाजू युद्धबंदी काळात एकमेकांवर हल्ले करणार नाहीत. याआधी ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. निष्पाप नागरिकांची हत्या करत दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये हिंसेचे थैमान घातले होते. दहशतवाद्यांनी ठार केलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने मुले आणि महिला होत्या. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार हमास तीस मुले आणि वीस महिला यांची सुटका करणार आहे.

              

सम्बन्धित सामग्री