Saturday, October 05, 2024 03:09:16 PM

अदानींच्या श्रीलंकेतील प्रकल्पात अमेरिकेची गुंतवणूक

अदानींच्या श्रीलंकेतील प्रकल्पात अमेरिकेची गुंतवणूक

कोलंबो, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी श्रीलंकेतील कोलंबो बंदरात खोल पाण्यात जहाजांसाठी नवा धक्का उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ५५३० लाख अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेतील सरकारी वित्तसंस्थेने अदानींच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोलंबो बंदर हे हिंद महासागरातील सर्वाधिक सक्रीय असलेले बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरावर अदानी उभारणार असलेल्या नव्या धक्क्यामुळे श्रीलंकेच्या व्यापाराला चालना मिळणार आहे. यामुळे अदानींच्या प्रकल्पाचे महत्त्व वाढले आहे.

कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड सेझ लिमिटेड, श्रीलंकेचे जॉन कील्स होल्डिंग्ज, श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटी हे संयुक्तपणे कोलंबो बंदरातील नव्या धक्क्याचे अर्थात डीप वॉटर शिपिंग टर्मिनलचे काम करणार आहेत.


सम्बन्धित सामग्री