Tuesday, July 02, 2024 08:58:07 AM

फिलिपाईन्स चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून बाहेर

फिलिपाईन्स चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून बाहेर

मनिला, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : फिलिपाईन्स हा आग्नेय आशियामधील देश चीनच्या महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वेन रोड प्रकल्पातून बाहेर पडला आहे. वन बेल्ट वेन रोड प्रकल्पांतर्गत फिलिपाईन्समधील तीन रेल्वे प्रकल्पांना चीनकडून आर्थिक मदत मिळणार होती. पण चीनकडून रेल्वे प्रकल्पांसाठी मदत घ्यायची नाही, अशी भूमिका फिलिपाईन्सने घेतली आहे. याआधी फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो डुटर्टे यांच्या प्रशासनाने चीनच्या वन बेल्ट वेन रोड प्रकल्पांतर्गत रेल्वे प्रकल्पांसाठी मदत घेण्याच्या प्रस्तावावर सही केली होती. फिलिपाईन्सचा निर्णय हा चीनसाठी धक्का समजला जात आहे. चीनने वन बेल्ट वेन रोड प्रकल्पात अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पाद्वारे चीन शेजारी देशांसोबतचा व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण फिलिपाईन्सच्या नव्या भूमिकेमुळे चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

………

१. अडीच अब्ज डॉलरचा कैलाम्बा ते बिकोल हा ३८० किमी. चा रेल्वे मार्ग
२. १.४५ अब्ज डॉलरचा मिंडानाओमधील १०० किमी. चा संगणकीकृत रेल्वे प्रकल्प
३. सुबिक बे फ्रीपोर्ट ते क्लार्क फ्रीपोर्ट पोर्ट हा मालवाहक रेल्वेगाड्यांसाठीचा ७१ किमी. चा मार्ग, ८९६० लाख डॉलरचा प्रकल्प


सम्बन्धित सामग्री