Saturday, October 05, 2024 04:49:40 PM

रशिया सीटीबीटी करारातून बाहेर

रशिया सीटीबीटी करारातून बाहेर

मॉस्को, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : रशिया सीटीबीटी करारातून बाहेर पडला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एका विधेयकावर सही केली. यानंतर रशिया सीटीबीटी करारातून बाहेर पडला.

अमेरिकेने सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर सही केली आहे. पण या कराराला अमेरिकेच्या संसदेकडून मान्यता मिळालेली नाही. या परिस्थितीत रशियाने करारामध्ये अडकून पडण्यात अर्थ नाही. जागतिक समतोल साधण्यासाठी सीटीबीटीतून बाहेर पडत आहे, असे रशियाकडून जाहीर करण्यात आले. याआधी रशियाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या मतदानावेळी सीटीबीटीतून बाहेर पडण्यासाठी सादर केलेल्या विधेयकाला पाठिंबा दिला होता.

सीटीबीटी १९९६ मध्ये झाला. या कराराला अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, इस्रायल, इराण, इजिप्त या देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. आता रशिया सीटीबीटीतून बाहेर पडला आहे. यामुळे सीटीबीटी अर्थहीन झाला आहे.

        

सम्बन्धित सामग्री