Tuesday, July 02, 2024 09:14:21 AM

पाकिस्तानमध्ये दहशतवादी दाऊद मलिकची हत्या, अज्ञातांनी केला हल्ला

पाकिस्तानमध्ये दहशतवादी दाऊद मलिकची हत्या अज्ञातांनी केला हल्ला

इस्लामाबाद, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद मलिक याची पाकिस्तानमध्ये हत्या झाली. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात दाऊद मलिकचा मृत्यू झाला. 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूर अझर याच्या विश्वासूंपैकी एक अशी त्याची ओळख होती. 'जैश-ए-मोहम्मद' व्यतिरिक्त दाऊद मलिक लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जंगवीशीही संबंधित होता. याआधी पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार शाहिद लतीफ आणि आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ या दोघांचा अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला.

दहशतवादी शाहिद लतीफ

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. शाहिद लतीफ हा २०१६ च्या पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते.

दहशतवादी मुल्ला बहूर

आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ याने कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना आयएसआयच्या ताब्यात दिलं होतं. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. तेथून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.

     

सम्बन्धित सामग्री