Tuesday, July 02, 2024 09:16:00 AM

अज्ञातांचे कारनामे सुरूच…

अज्ञातांचे कारनामे सुरूच…

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी शाहीद लतीफ याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केले. भारतात पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी शाहीद लतीफ याला अज्ञातांनी सियालकोटमधील एका मशिदीच्या आवारात ठार केले. अतिशय जवळून शाहीद लतीफवर गोळ्या झाडण्यात आल्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०१० मध्ये पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी भारताने शाहीद लतीफ आणि इतर २४ दहशतवाद्यांना सोडले होते. याआधी १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचे अपहरण झाले होते. प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी सुरुवातीला ३२ दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. या यादीत शाहीद लतीफचे नाव होते. पण वाजपेयी सरकारने ही यादी फेटाळली होती. नंतर १५४ प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेसाठी वाजपेयी सरकारने मौलाना मसूद अजहर आणि इतर दोन अशा तीन दहशतवाद्यांना सोडले होते.

काही महिन्यांपूर्वी सॅनफ्रान्सिकोमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला झाला होता. हा हल्ला खलिस्तान्यांनी केला होता असे नंतर तपासात समोर आले होते. या हल्ल्यामागे जे खलिस्तानी होते ते हळू हळू मारले गेले. हे खलिस्तानी प्रमुख जे मारले गेले त्यांना मारलं कोणी ? याबाबत सातत्यानं चर्चा होत होत्या पण कुणी यावर काही स्पष्ट भाष्य केलं नव्हतं, आणि जगात इतर देशांना याबद्दल माहिती असली तरी कोणी जाहीरपणे बोलत नव्हतं. पण वादाची ठिणगी त्यावेळी फुटली ज्या वेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर याचे आरोप केले ते हे कॅनडाच्या संसदेत…. आता वाद निर्माण झाला आहे की भारतविरोधी कारवाया करणारे दहशदवादी किंवा खलिस्तानी एक एक करत कोण संपतंय…. या अज्ञातांचे हात हजार

भारतात जेव्हा पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनी दहशदवादी हल्ल्यांप्रती आपली भूमिका आधीच स्पष्ट केली केली की दहशदवाद्यांना आता भारत सोडणार नाही. ज्या देशात हे दहशदवादी लपून बसले असतील त्यांना तिथे जाऊन ठार केले जाणार असे मोदींनी आधीच स्पष्ट केले,
त्यानंतर भारताला हवे असलेल्या यादीतील एक एक दहशदवादी मारले जाऊ लागले.

भारताला हवे असणारे काही दहशदवादी संघटनेचे प्रमुख वेगवेळ्या देशात वेगवेगळ्या हल्ल्यात मारल्या गेले. कोण कुठे कसे मारले गेले आणि कोणत्या दहशदवादी संघटनेचे ते सदस्य, प्रमुख होते ते सुद्धा आपण पाहुयात

कोणकोणते दहशतवादी अज्ञातांच्या गोळीबारात झाले ठार

रयाज अहमद - पीओकेमध्ये गोळीबारात ठार - लष्करे तैय्यबा
बशीर अहमद - हिजबुल मुजाहिद्दीन संघटना
सय्यद खालिद रजा - अल बद्र
मिस्त्री जाहूर इब्राहिम - जैश ए मोहम्मद
पारंजीत सिंग पंजवार - खलिस्तानी कमांड फोर्स
अवतार सिंग खंडा - खलिस्तानी
हरमीत सिंग - संघाच्या २ नेत्यांची हत्या केली होती.

एनआयएने खलिस्तानशी संबंधित २० हून अधिक लोकांना कॅनडातील वॉन्टेड यादीत समाविष्ट केले आहे. त्यांच्यावर भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आणि भारताविरुद्ध अपप्रचार केल्याचा आरोप आहे. एनआयएने या लोकांची भारतातील मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

भारताला मोस्ट वॉन्टेड…

परमजीत सिंग पम्मा
वाधवा सिंग उर्फ ​​बब्बर चाचा
कुलवंत सिंग मुथरा
जेएस धालीवाल
सुखपाल सिंग
हरप्रीत सिंग उर्फ ​​राणा सिंग
सरबजीत सिंग बेन्नूर
कुलवंत सिंग उर्फ ​​कांता
हरजाप सिंग उर्फ ​​जप्पी सिंग
रणजित सिंग नीता
गुरमीत सिंग उर्फ ​​बग्गा बाबा
जसमीत सिंग हकीमजादा
गुरजंत सिंग धिल्लन
लखबीर सिंग रोडे
अमरदीप सिंग पुरेवाल
जतिंदर सिंग ग्रेवाल
दुपिंदर जीत
एस. हिम्मत सिंग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतविरोधी कारवाया वाढल्यानंतर भारतीय एजन्सी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच RAW आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये तपास सुरू केला आहे जिथे खलिस्तान समर्थक सक्रिय आहेत.

एनआयएने ५ आणि ६ ऑक्टोबरला दिल्लीत बैठक बोलावली आहे. यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे सर्वजण खलिस्तानी दहशतवादी कारवाया आणि निधी रोखण्याच्या योजनेवर काम करतील.
केंद्रीय तपास यंत्रणेशी संबंधित एका अधिकाऱ्याने आपले नाव न सांगताना सांगितले की, भारताने खलिस्तान चळवळीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निधी पुरवणारे देश, एजन्सी, कंपन्या आणि लोकांची यादी तयार केली आहे. यावर कारवाई करण्यासाठी राजनैतिक पातळीवर कॅनडासारख्या देशांवर दबाव आणला जाईल.

अधिकाऱ्याने सांगितले की, कॅनडाशिवाय खलिस्तानी दहशतवाद्यांना सर्वात मोठा अप्रत्यक्ष निधी अमेरिकेतून मिळतो. २०२१ मध्ये संशोधन संस्थेने हडसन इन्स्टिट्यूटने अमेरिकेतील खलिस्तानी फुटीरतावादी कारवायांचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार खलिस्तान चळवळीला शह देण्यासाठी अमेरिकेत ५५ काश्मिरी आणि खलिस्तानी गट एकत्र काम करत आहेत.

खलिस्तान्यांना आर्थिक पाठबळ कुठून ?

अंमली पदार्थांची तस्करी
शास्त्रांची तस्करी
क्लब आणि बारमध्ये गुंतवणूक
ऑनलाईन जुगार
देणगी

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जाहीर केलेल्या ४१ दहशतवादी आणि गुंडांच्या यादीत समाविष्ट असलेला पंजाबचा कुख्यात गुंड सुखदुल सिंग उर्फ ​​सुख्खा दुनाके याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सुक्खावर चार खुनासह एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत. उल्लेखनीय आहे की, सुखा दुनाके हा २०१७ पासून बनावट पासपोर्टचा वापर करून कॅनडात फरार होता. सुखदुल सिंग हा पंजाबमधील मोगा येथील रहिवासी होता.

        

सम्बन्धित सामग्री