Thursday, July 04, 2024 09:33:47 AM

इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा सुरू

इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा सुरू

जेरुसलेम, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून इस्रायल विरोधात ऑपरेशन अल-अक्सा फ्लड सुरू केले आहे. हल्ल्याची सुरुवात शनिवारी सकाळी झाली. हमासने वीस मिनिटांत पाच हजारांपेक्षा जास्त क्षेपणास्त्रांद्वारे हवाई हल्ला केला. ठिकठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सैनिकांवर गोळीबार केला. हल्ल्यांना सुरुवात होताच इस्रायलमध्ये ठिकठिकाणी धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा वाजू लागली. इस्रायलने या हल्ल्याचा प्रतिकार सुरू केला आहे.

हवाई हल्ल्यापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी इस्रायलकडे आधुनिक यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या मदतीने अनेक क्षेपणास्त्र निकामी केल्याचे इस्रायलकडून सांगण्यात येत आहे. किती क्षेपणास्त्रांमुळे हानी झाली आणि या हानीचे स्वरुप याबाबत इस्रायल सरकारने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.

इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या पंधरा वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मे २०२१ मध्ये झाली.

हमासच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू

हमासच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आणि दोनशे नागरिक जखमी झाले आहेत.

'आम्ही लढाई लढत आहोत'

हमासच्या हल्ल्यानंतर देशवासियांना उद्देशून बोलताना आम्ही लढाई लढत आहोत असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.

भारतीयांसाठी सावध राहण्याचा इशारा

इस्रायलमध्ये असलेल्या सर्व भारतीयांना 'स्वतःची काळजी घ्यावी आणि दूतावासाच्या संपर्कात राहून सुरक्षित असल्याची माहिती द्यावी', असे आवाहन भारत सरकारने केले आहे.

हमासच्या हल्ल्याचा नेपाळला फटका

हमासच्या हल्ल्यात सात नेपाळी जखमी आणि १७ नेपाळींचे अपहरण

           

सम्बन्धित सामग्री