Sunday, July 07, 2024 02:42:30 AM

मोरोक्कोत ६.८ तीव्रतेचा भूकंप

मोरोक्कोत ६८ तीव्रतेचा भूकंप

मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी मोजण्यात आली आहे. मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे किमान १०३७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२०० जण जखमी झाले आहेत.

मात्र या भूकंपातील मृतांची संख्या लक्षणीय वाढू शकते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून ७१ किमी दक्षिण-पश्चिमेस १८.५ किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री ११.११ च्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहराबाहेरील जुन्या भागाचे झाले आहे. मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग पाहायला मिळत आहेत.

मराकेशमध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर लोक धावताना आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करतानाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद क्षणांमध्ये माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पोस्ट करण्यात आलं आहे.


सम्बन्धित सामग्री