Sunday, July 07, 2024 02:33:24 AM

earthquake-in-indonesia
इंडोनेशियात ७ रिश्टरचा भूकंप

इंडोनेशियात ७ रिश्टरचा भूकंप

बाली, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : इंडोनेशियातील बाली कुटा जवळ समुद्रात ७ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. बनयुवांगी, बाली, लोम्बोक येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मातारमच्या उत्तरेस २०१ किमीवर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 518 किमी खाली होता. भूकंपानंतर अद्याप जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. https://www.youtube.com/watch?v=UwAt4C2LD4I भूकंपानंतर सूनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये इंडोनेशियातील पश्चिम जावामध्ये ५.६ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपात ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आणि हजारो नागरिक जखमी झाले होते. महाराष्ट्रातले पर्यटक सुरक्षित इंडोनेशियात भूकंप झाला आहे. यामुळे इंडोनशियात असलेल्या पर्यटकांच्या चिंतेने त्यांच्या नातलगांनी फोनोफोनी सुरू केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिकहून इंडोनेशियाला गेलेले पर्यटक सुरक्षित आहेत. महत्त्वाचे मुद्दे इंडोनेशियाच्या बाली कुटा शहरात भूकंपाचे धक्के भारतातील अनेक पर्यटक अडकले इमारती, हॉटेल रिकाम्या करण्याच्या स्थानिक प्रशासनाच्या सूचना नाशिकहून इंडोनेशियाला गेलेले पर्यटक सुखरूप


सम्बन्धित सामग्री