जपानमधील एका मासळी लिलावाने यंदा संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे

टोकियो शहरातील प्रसिद्ध मासळी बाजारात झालेल्या नववर्षाच्या पहिल्या लिलावात एक प्रचंड ब्लूफिन टूना मासा सुमारे 29 कोटी रुपयांना विकला गेला

विशेष म्हणजे, या एकाच माशाने आतापर्यंतचे सर्व किंमतींचे विक्रम मोडीत काढले आहेत

हा महागडा ब्लूफिन टूना जपानमधील सुप्रसिद्ध सुशी उद्योजक कियोशी किमुरा यांच्या रेस्टॉरंट साखळीने खरेदी केली आहे

स्वतःला ‘टूना किंग’ म्हणवणारे किमुरा हे टोकियोतील नामांकित सुशी ब्रँडचे मालक असून दरवर्षी नववर्षाच्या

पहिल्या लिलावात ते मोठी बोली लावण्यासाठी ओळखले जातात

यंदा त्यांनी 243 किलोग्राम वजनाच्या या ब्लूफिन टूनासाठी विक्रमी रक्कम मोजली

हा मासा जपानच्या उत्तरेकडील समुद्र किनाऱ्याजवळ पकडण्यात आला

आकाराने मोठा, वजनदार आणि दर्जेदार असल्यामुळे या टूनाला मोठ्या प्रमाणात मागणी होती

टोकियोच्या मासळी बाजारात दरवर्षी 1 जानेवारी रोजी होणारा पहिला लिलाव जपानमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो

या लिलावात खरेदी केलेली मासळी व्यवसायासाठी शुभ मानली जाते, त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींच्या बोली लावल्या जातात

पण ब्लूफिन टूना इतकी महाग का असते?

हा मासा सुशी आणि साशिमी बनवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो

त्याचं मांस अत्यंत मऊ, चविष्ट आणि दर्जेदार असतं. शिवाय टूना मासा दुर्मिळ असून वेगवान असतो

त्यामुळे जपानसारख्या देशात ब्लूफिन टूना हा केवळ मासा नसून प्रतिष्ठा, परंपरा आणि व्यवसायाचा भाग बनला आहे