Sankashti Chaturthi Kadavya Vaalachi Khichadi Recipe: उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला आलाय? मगं संकष्टी चतुर्थी स्पेशल बनवा कडव्या वालाची खिचडी

संकष्टी चतुर्थीनिमित्त तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर, कडवे वाल, तांदूळ आणि नारळाचे दूध वापरून बनवली जाणारी कडवे वालची खिचडी नक्की ट्राय करा.

मोड आलेले कडवे वाल आणि तांदूळ नारळाच्या दुधात किंवा मसाल्यात शिजवून कडव्या वालाची खिचडी चवदार पदार्थ बनवला जातो.

यासाठी कडवे वाल, तांदूळ, 1 वाटी खवलेले ओले खोबरे, एक कापलेला कांदा, लसूण-अद्रक पेस्ट, मोहरी, जिरे आणि हिंग, हळद-तिखट मसाले

सर्वात आधी एका कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्यावी, तसेच त्यात चिरलेला कांदा घालून छान असं परतून घ्यावे.

यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि हळद घालून त्यात लाल तिखट किंवा गोडा मसाला घालून सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.

तांदूळ स्वच्छ धुऊन सोललेले वाल आणि तांदूळ कुकरमध्ये टाका, थोडा वेळ हे मिश्रण परतून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि खोवलेले खोबरे टाका.

तांदळाच्या प्रमाणात गरम पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून खिचडी शिजवून घ्या.

त्यानंतर पापड तळून घ्या आणि तयार झालेल्या गरमागरम खिचडीवर तूप घालून ती कुरकुरीत पापडासह सर्व्ह करा.