भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं

सुमारे दीडशे वर्षांच्या संघर्षानंतर इंग्रजांची सत्ता भारतातून संपुष्टात आली

स्वातंत्र्याच्या वेळी देशात इंग्रजांनी उभारलेली प्रशासकीय व राज्यव्यवस्था अस्तित्वात होती

स्वातंत्र्यानंतर स्वतःची राज्यव्यवस्था उभारण्यासाठी भारतीयांनी संविधान सभेची स्थापना केली

देशासाठी संविधान तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधान सभेने केले

संविधान सभेने तयार केलेले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आले

भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक देश झाला

याच कारणामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो