मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या बोटावर निळ्या शाईने खूण केली जाते

निळी शाई ही सिलव्हर नायट्रेट, विविध रंग आणि सॉल्व्हेंट्स यांचं मिश्रण असतं

या शाईला ''इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखलं जातं

शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट केमिकलचं प्रमाण 10 ते 18 टक्के असतं

जेव्हा ही शाई बोटावर लागते, तेव्हा आपल्या शरीरातील मीठासोबत प्रक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराइड बनतं

सिल्व्हर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही ज्यामुळे आपल्या त्वचेवर त्याची खूण राहते

बोटावर लावल्यानंतर अगदी सेकंदातच त्याची खूण उमटते आणि 40 सेकंदातच ही शाई पूर्णपणे सुकते

पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर निळी शाईचा रंग काळा होतो

तुम्ही कितीही साबण, पावडर किंवा तेल लावा, ही खूण निघत नाही

किमान 72 तास तरी त्वचेवरून या निळ्या शाईची खूण काढता येत नाही.