पंतप्रधान यशस्वी योजनेचा फायदा कोणाला मिळणार?
देशात अनेक गरजवंत मुले आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे
परिस्थिती बिकट असल्याने अनेक गरजवंत मुलांची शिक्षण घेण्याची इच्छा राहून जाते
गरजवंत मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी पंतप्रधान यशस्वी योजना सुरू करण्यात आली आहे
पंतप्रधान यशस्वी योजना ईबीसी, ओबीसी, डीएनटी समुदायातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे
कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे. संबंधित विद्यार्थी नववी किंवा अकरावीत शिकणारा असावा
विशेष म्हणजे, संबंधित शाळेच्या संस्थानाने 100 टक्के निकाल मिळवणे गरजेचे आहे
जे विद्यार्थी या अटींची अंमलबजावणी करतील, तेच विद्यार्थी पंतप्रधान यशस्वी योजनेसाठी पात्र आहेत
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 75 हजार आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दीड लाख शिष्यवृत्ती मिळते
योजनेत अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि नोंदणी पर्याय निवडा
नवीन पृष्ठावर तुमचे नाव, इमेल आयडी, पत्ता, जन्मतारीख आणि पासवर्ड भरून तुमचे खाते तयार करा
रेजिस्ट्रेशन केल्यानंतर पीडीएफ डाऊनलोड करा. पीडीएफमध्ये तुमचा अर्ज केलेला क्रमांक असेल
पंतप्रधान यशस्वी योजनेची शिष्यवृत्ती डायरेक्ट बेनेफिट्स ट्रान्सफर (DBT) सोपवली जाते
ही प्रक्रिया ऑनलाईन आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहे