Balasaheb Thackeray Death Anniversary : हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन उजाळा
आजही हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान आहे
17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब केशव ठाकरे यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त काही गोष्टी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. बाळासाहेब यांचे वडील केशव ठाकरे हे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते होते
बाळासाहेब ठाकरे यांची एक कार्टूनिस्ट म्हणून खूप ख्याती होती. त्यांनी 1960 मध्ये त्यांनी ''मार्मिक'' नावाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केले. मराठी भाषेतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक होते
नंतर मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. यातूनच 1966 साली ''शिवसेना'' या राजकीय पक्षाची स्थापना झाली
यामार्फत त्यांनी मराठी माणूस, स्थानिकांच्या रोजगाराचा संरक्षण, आणि मराठी स्वाभिमान यासाठी भूमिका मांडली
पुढे जाऊन ते समस्त भारतातील हिंदुत्व राजकारणाचे प्रभावी नेतृत्त्व म्हणून उदयास आले
बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जानेवारी 1989 रोजी ''सामना'' या मराठी दैनिक वृत्तपत्राची स्थापना केली आणि बाळासाहेब ठाकरे या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक होते
हृदयविकाराचा झटक्याने 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले