अनेकदा रेशन कार्ड फाटतं किंवा जुनं झाल्यामुळे त्यावरची अक्षरं पुसट होतात, बऱ्याचदा रेशन कार्ड हरवतं देखील
असं कधी तुमच्यासोबत झालं तर तुम्ही डिजिटल आणि PVC रेशन कार्ड काढू शकता
''मेरा रेशन'' हा अधिकृत मोबाईल अॅप इन्स्टॉल करा, त्यानंतर लाभार्थी (Beneficiary) हा पर्याय निवडावा
रेशन कार्डशी लिंक असलेला आधार क्रमांक भरून कॅप्चा टाका आणि ओटीपीच्या मदतीने लॉग-इन करा
या कार्डवर कुटुंब प्रमुखाचे नाव, रेशन कार्ड क्रमांक तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची सविस्तर माहिती दिसते
तिथे ई-रेशन कार्ड डाउनलोड हा पर्याय असेल तिथून डाउनलोड कल्यास तुम्हाला ई-रेशन कार्ड पीडीएफ स्वरूपात मिळेल
या पीडीएफची कॉपी शासकीय कामांसाठी ग्राह्य धरली जाते
डाउनलोड केलेल्या ई-रेशन कार्डचे PVC कार्ड म्हणजेच प्लास्टिक कार्ड तयार करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या परिसरातील PVC कार्ड प्रिंटिंगची सुविधा देणाऱ्या केंद्रांशी संपर्क साधावा लागेल