बिहार निवडणुकीच्या रिंगणात Gen-Z ची चर्चा

बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा Gen Z उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू आहे

तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे

भाजपच्या 25 वर्षीय मैथिली ठाकूर अलीनगरमधून आघाडीवर आहे

भाजपने शाहपूरमधून 30 वर्षीय राकेश रंजन यांनाही तिकीट दिले आहे

जेडीयूच्या 27 वर्षीय रवीना कुशवाहा विभूतीनगरातून निवडणूक लढवत आहेत

जेडीयूने सकरामधून 30 वर्षीय आदित्य कुमार यांना उमेदवारी दिली आहे

गायघाट मतदारसंघातून जेडीयूच्या 30 वर्षीय कोमल सिंह निवडणूक लढवत आहेत

एलजेपीने (रामविलास) फतुहामधून 29 वर्षीय रूपा कुमारीला तिकीट दिले आहे

CPI-ML ने भोरे मतदारसंघातून 29 वर्षीय धनंजय कुमार यांना उमेदवारी दिली आहे

राजदमध्ये बाराचट्टीतून 26 वर्षीय तनुश्री कुमारी, लालगंजमधून 28 वर्षीय दीपू सिंह आणि 29 वर्षीय रविरंजन हेही युवा उमेदवार

काँग्रेसने 25 वर्षीय नवीन कुमार यांना पक्षातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून पुढे केले आहे